News Flash

“महाविकास आघाडीचे सरकार करोनाच्या तिरडीवर झोपलेले”

जाणून घ्या हे वक्तव्य केलंय कुणी?

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे करोनाच्या तिरडीवर झोपलेले सरकार आहे. या सरकारलाच करोना झाला असून सरकारमधले सगळे मंत्री क्वारंटाइन झाले आहेत अशी जळजळीत टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारमधले सगळे मंत्री क्वारंटाइन झाले. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही घेणंदेणं नाही असाही घणाघाती आरोप खोत यांनी केला आहे.

लॉकडाउन आणि नैसर्गिक आपत्ता यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. हे सांगत असतानाच सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक प्रहार केला आहे. एबीपी माझाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

..तर दूध फुकट द्यायला तयार

महाविकास आघाडीचं हे सरकार आमची लूटच करणार असेल तर आम्ही दूध फुकट द्यायला तयार आहोत. तुम्ही घेऊन जावा, यातून सरकार जागं झालं तर ठीक नाही जागं झालं तर मात्र दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल. कारण शेतकऱ्यांसमोर आता सरकारने दुसरा पर्यायच ठेवलेला नाही.

शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांना घेणंदेणं नाही

महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढताना खोत म्हणाले “निसर्ग चक्रीवादळ आल्याने कोकणातले शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांनी सोयबीनची पेरणी केली त्यात बियाणे बोग निघाल्याने पीक उगवले नाही. शेतकऱ्यांसाठी जी व्यवस्था सरकारने उभी करायला हवी ती उभी केलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही घेणेदेणे नाही.” असंही खोत यांनी म्हटलं आहे.

करोनाची स्थिती गंभीर
महाराष्ट्रातील करोनाची स्थिती गंभीर आहे. करोना सदृष्य लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींची चाचणी वेळेत केली जात नाही. उपचारांसाठी बेड उपलब्ध नाहीत. मतदारसंघांचा विकासनिधी थांबवण्यात आला आहे. या स्थितीमुळेच विकासालाही ब्रेक लागला आहे. तिन्ही पक्षांमधली नाराजी वाढते आहे. या नाराजीचा स्फोट होईल याचीही आपल्याला खात्री आहे असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 12:38 am

Web Title: sadabhau khot slams mahavikas aaghadi government on farmer issue scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पतसंस्थांच्या ठेवी वाढल्या, पण कर्जदार मिळेनात!
2 सांगली पालिका, जिल्हा परिषदेत सारे काही आलबेल नाही!
3 सांगली जिल्ह्य़ात कर्जमुक्ती योजनेत १४१ जणांकडून अपहार
Just Now!
X