News Flash

‘माझ्या देशात लोक मरत असताना मी लग्न…’, अभिनेत्रीने घेताला मोठा निर्णय..

आता ही अभिनेत्री पुढच्या वर्षी लग्न करणार आहे.

‘ससुराल सिमर का’ छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री वैशाली टक्कर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. गेल्या महिन्यात वैशालीचा साखरपुडा झाला. या महिन्यात ती डॉ. अभिनंदन सिंह हुंडलसोबत लग्न करणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, वैशालीने आता ती लग्न करणार नसून पुढच्या वर्षी करणार असल्याचे सांगितले आहे.

वैष्णवीने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाच्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. “सध्या मी विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपसोबत काम करत आहे. हा ग्रुप करोना काळात गरजूंना मदत करतं आहे. आम्ही सर्वजणं गरजूंना अन्न आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे काम करत आहोत,” असे वैष्णवी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

पुढे वैष्णवी म्हणाली, “करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता मी माझं लग्न पुढे ढकलले आहे. लग्न करून देश सोडून जावसं मला अजिबात वाटतं नाही. अशा बिकट परिस्थितीत मी आनंदी कशी राहू, लग्नाचं सेलिब्रेशन कसं करू, जेव्हा माझ्या देशातले लोक मरत आहेत. त्यामुळे मला लोक दु:खात असताना माझं नवं आयुष्य सुरु करण्यापेक्षा गरजूंना आणि पीडितांची मदत करणे जास्त गरजेचे असल्याचे मला वाटतं. म्हणूनच मी सध्या तरी लग्न, उत्सव आणि देश सोडून जाण्याची माझी इच्छा नाही.”

आणखी वाचा : करीना की प्रियांका? मीराने सांगितले शाहिदच्या न आवडणाऱ्या एक्स गर्लफ्रेंडचे नाव

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पाहता अनेक सेलिब्रिटी पुढे येऊन मदत करत आहेत. फक्त बॉलिवूड नाही तर छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार पुढे येऊन मदत करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 7:41 pm

Web Title: sasural simar ka actress vaishali takkar postpones her wedding to next year will help the needy in covid 19 crisis dcp 98
Next Stories
1 राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, राज्य सरकारचा निर्णय
2 “स्वतःच्या कौतुकाची टीमकी वाजवण्यातच मशगुल असणाऱ्या राज्य सरकारचे न्यायालयाने वाभाडे काढले”
3 VIDEO: अल्लू अर्जुनने केली करोनावर मात; १५ दिवसानंतर भेटला कुटूंबीयांना
Just Now!
X