28 September 2020

News Flash

शिवरायांच्या समाधीवर घोषणाबाजी; शिवसेना आमदाराचा माफीनामा

खासदार छत्रपती संभाजी राजे आणि शिवभक्तांकडून यावर आक्षेप घेतला गेला.

अलिबाग : किल्ले रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधिस्थळावर चढून शिवसनिकांनी राजकीय घोषणाबाजी केली, याचे समाजमाध्यमांवर तीव्र पडसाद उमटले. खासदार छत्रपती संभाजी राजे आणि शिवभक्तांकडून यावर आक्षेप घेतला गेला. यानंतर शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी संध्याकाळी माफीनामा सादर केला.

महाडचे शिवसेना आमदार गोगावले व त्यांचे समर्थक किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज समाधिस्थळावर चढून राजकीय घोषणा देतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या राजकीय घोषणाबाजीवर शिवभक्तांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. समाधी आणि रायगडाचे पावित्र्य जपणे ही सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. समाधिस्थळावर चढून घोषणाबाजी करणे योग्य नाही, असे मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले होते.

कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अथवा पदाधिकाऱ्यांचा हेतू नव्हता. शिवभक्त म्हणून नेहमी रायगडावर जाऊन नतमस्तक होत असतो. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांकडून अजाणतेपणाने राजकीय घोषणा दिल्या गेल्या. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

– भरत गोगावले, आमदार, शिवसेना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 2:12 am

Web Title: shiv sena mla express apology shouted slogans at shivaji samadhi zws 70
Next Stories
1 राज्य ‘एटीएस’ला आंध्र सरकारचे आठ लाखांचे पारितोषिक!
2 पुढची 20 वर्षे मीच खासदार राहणार!-सुजय विखे पाटील
3 बॅलेट पेपर इतिहासजमा! निवडणूक EVM वरच होणार-मुख्य निवडणूक आयुक्त
Just Now!
X