News Flash

सिंधुदुर्ग जिल्हय़ात तापमानात वाढ

संध्याकाळी ४ वा. ३५ अंश सेल्सिअस तापमान होते.

 

सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या हवेतील तापमानात वाढ झाली असून त्याचा परिणाम फळबागायतीवर होण्याची भीती आहे.

सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री तापमानातील समतोलातील फरक बागायतींना होईल, असे जाणकार सांगतात.  सिंधुदुर्गात सकाळी २४ अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

संध्याकाळी ४ वा. ३५ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेतील तापमान वाढलेले असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाची दाट शक्यता या वातावरणातून दिसून येत आहे.

जिल्हय़ातील हे वातावरण आंबा, काजू बागायतींना धोकादायक वाटत असल्याचे सांगण्यात येते. या ढगाळ वातावरणामुळे उशिराने मोहर आलेल्या फलधारणेस धोका होऊ शकतो.

तसेच सकाळी पडणाऱ्या खार धुक्यामुळे मोहर गळून पडू शकतो अशी भीती आहे. जिल्हय़ात गेले काही दिवस उष्णतेच्या लाटा बसत असून  दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. संध्याकाळी ४ वा. ३५ अंश सेल्सिअस तापमान वाढले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 1:00 am

Web Title: temperature raised in sindhudurg
टॅग : Sindhudurg,Temperature
Next Stories
1 नव्या पिढीला ‘भारत माता की जय’ बोलायला शिकवावं लागतं- भागवत
2 पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; पुण्यातील चार तरूणांचा मृत्यू
3 सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात वरिष्ठ अधिकाऱ्यासह दोघे ठार
Just Now!
X