News Flash

धोक्याची घंटा! राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.७५ टक्के

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे ठरले आहे. गेल्या काही दिवसांत दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक होती.

राज्यात आज ५७५३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ४०६० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १६,५१,०६४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, राज्यात एकूण ८१,५१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.७५ टक्के झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 10:06 pm

Web Title: today the number of patients increased compared to the number of patients recovering in the state aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जनतेच्या नाराजीची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच व्यक्त केली नाराजी; भाजपाची मुख्यमंत्र्यांवर टीका
2 सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका – मुख्यमंत्री
3 महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळले – हसन मुश्रीफ
Just Now!
X