27 May 2020

News Flash

अन्नदान करून परतणारी रिक्षा उलटल्याने दोन जण ठार

लोकांना मदत करून परतत असताना अपघात

संग्रहित छायाचित्र

गरजूंना अन्नदान करून परतत असताना रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री अमळनेर येथे हा अपघात झाला.

राज्यात टाळेबंदी असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. अशाच लोकांना मदत करून परतत असताना हा अपघात झाला. अमळनेर येथील श्रीरामनगर परिसरातील आठ युवक गरजूंना अन्नदान करण्यासाठी झाडी आणि मुडी गावाला गेले होते. मुडी येथून परतत असतांना झाडी गावाजवळ अचानक त्यांची रिक्षा उलटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.

ऋषिकेश उमेश शेटे आणि विशाल दिनेश पाटकरी अशी या दोघांची नावे आहेत. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी जयेश पाटील याची प्रकृती चिंताजनक आहे. अक्षय महाजन आणि चेतन चौधरी हे किरकोळ जखमी असून जखमींना धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 12:17 am

Web Title: two killed in reverse rickshaw return abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 इस्लामपूरमधील १० जण करोनामुक्त
2 मिरजेतील डॉक्टरांकडून पोलिसांची वैद्यकीय तपासणी
3 महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४, आत्तापर्यंत ९७ जणांचा मृत्यू
Just Now!
X