अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार याचा जामीन अर्ज अचलपूर येथील न्यायालयाने शनिवारी फेटाळला. यामुळे विनोद शिवकुमारला आता जामिनासाठी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे.

दीपाली चव्हाण या वनपरिक्षेत्र अधिकारी होत्या. आत्महत्येची घटना घडल्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी या नात्याने सर्वप्रथम पोलिसांना याची माहिती देणे ही तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांची जबाबदारी होती.

पण, त्यांनी आपल्या जबाबदारीचे पालन न करता तेथून पळ काढला, त्यातूनच विनोद शिवकु मार यांच्या जाचाला कं टाळून दीपाली यांनी आत्महत्या के ल्याचे स्पष्ट होते, असा युक्तिवाद सरकारी आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी के ला.