“आज सर्वांना आनंद झाला आहे. 2014 मध्ये अमित शाह हे भगवान बाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आपल्याला सामान्यांसाठीचं आपलं सरकार लाभलं. आज अमित शाह यांनी जेवढं सीमोल्लंघन केलंय त्यापेक्षाही मोठं सीमोल्लंघन यापुढे त्यांच्याकडून घडणार आहे,” असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. सावरगावात पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

“आज इथली जागा कमी पडताना दिसत आहे. आताही लोकांचं येणं सुरू आहे. आज लोकांचं येणं सर्वच दृष्टीने चालू आहे आणि भविष्यातही हे असंच चालू राहणार आहे. आपला प्रवास गौरवशाली आहे. देशात राष्ट्रभक्तीचं केवळ सर्वांना एकत्र बांधू शकते. 370 च्या माध्यमातून राष्ट्रभक्ती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी 370 कलम हटवून न्याय मिळवून दिला. अमित शाह यांच्या नेतृत्वात सीमोल्लंघन करायचं आहे. सामान्यांसाठी वंचितांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी जी लढाई दिली ते काम आता सुरू झालं आहे. उमेदवारी अर्ज भरताना मी पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेतला. तेव्हा ते मला खुश राहा म्हणाले. त्यावेळी मला समजलं की मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणं आवश्यक आहे, असंही त्या म्हणाल्या.

“उसतोड कामगारांसाठी यापुढे पावलं उचलली जाणार आहे. माझ्या भावांच्या हाती कोयता घेण्याची वेळ येऊ देऊ नका,” असंही त्या म्हणाल्या. “आपलं नातं हे कधीच तुटणारं नाही. गोपीनाथ मुंडे यांनी जे काम हाती घेतलं आहे, तेच पुढे न्यायचं आहे. जे कोणालाही शक्य नव्हतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी करून दाखवलं. आज माझ्या कामाचं जे कौतुक केलं त्यामुळे मला कशाचीही अपेक्षा नाही. तुमच्या मान सन्मानासाठी काम करायचं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मला साथ दिली. त्यामुळे तुमच्या दारात सेवा यावी यासाठी काम करायचं आहे,” असंही त्या म्हणाल्या.