रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील तब्बल २० हजार जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसभरात करोनाचे २९८ नवे रुग्ण आढळून आले. तर ३८१ रुग्ण करोना मुक्त झाले. तर १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २४ हजार २३० वर पोहोचली आहे. तर करोनामुळे ७०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात २९८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील ११९, पनवेल ग्रामिणमधील ५४, उरण मधील ११, खालापूर १०, कर्जत ४, पेण १०, अलिबाग ३५, मुरुड ०, माणगाव ९, तळा ०, रोहा १४, सुधागड १, श्रीवर्धन १, म्हसळा १, महाड २७, पोलादपूर २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत २, पनवेल ग्रामिण १, खालापूर १, पेण ३, सुधागड १, महाड २ अशा एकूण १० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३८१ जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ८४ हजार १८४ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५५८ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३३७, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४२८, उरणमधील १७५, खालापूर १७६, कर्जत ८७, पेण २१३, अलिबाग ३०३, मुरुड २५, माणगाव ११८, तळा येथील १४, रोहा २१२, सुधागड ३५, श्रीवर्धन ३३, म्हसळा १२, महाड १६६, पोलादपूरमधील २४ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ८३ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20000 corona free in raigad district abn
First published on: 25-08-2020 at 00:16 IST