रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव विकास पॅनेलच्या सिद्धिका बोले या २५ वर्षांच्या तरुण उमेदवार ६ मतांनी विजय मिळवून थेट सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
या ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच इतक्या तरुण महिला उमेदवाराला ही संधी मिळाली आहे. कोंड असुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अतिशय अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत गाव विकास पॅनेलकडून सिद्धिका बोले आणि सोनाली शिंदे यांच्यात लढत झाली.
हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!
त्यामध्ये सोनाली शिंदे यांचा ६ मतांनी पराभव करून सिद्धिका बोले यांनी निसटता विजय प्राप्त केला. सिद्धिका बोले यांना एकूण २७०, तर सोनाली चंद्रकांत शिंदे यांना २६४ मते मिळाली. आंबेड बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. रघुनंद भडेकर, अनिरुध्द मोहिते, शोएब भाटकर आणि सुहास मायंगडे हे उमेदवार रिंगणात उभे होते. यामध्ये मानसकोंड येथील सुहास मायंगडे यांनी बाजी मारली.