हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग: पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यातील शहरी भागातल्या धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे, यात २५६ इमारती धोकादायक असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. यातील ७३ इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश नगर पालिका प्रशासनाने दिले आहेत.

२४ ऑगस्ट २०२० ला महाड येथे इमारत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. ४५ कुटूंबाचे संसार उघड्यावर आले होते. अतिवृष्टी आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत कोसळली होती. या दुर्घटनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्या पुर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. यानंतर या इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश दिले जातात.

हेही वाचा… “ठाण्यात पोलीस संरक्षण दिलेले १०० जण कोण? सरकारी पैशाची उधळपट्टी का?” अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल

जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या ११ नगरपालिका आणि ५ नगरपंचायती मधील सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. यात जिल्ह्यात १८३ धोकादायक तर ७३ अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. यात उरण, खोपोली, पेण, महाड, अलिबाग येथील धोकायदायक इमारतींची संख्या मोठी आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार इमारतींमधील रहिवाश्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… ‘एमपीएससी’ची उत्तरतालिका जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत हरकती नोंदवता येणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी निर्देशानंतरही खालापूर, श्रीवर्धन आणि पाली नगरपालिका आणि नगरपंचायतीनी अद्याप आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केलेले नाहीत. या नगरपंचायतींनी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे, तसेच तेथील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे.

शहर – धोकादायक – अतिधोकादायक

अलिबाग- १७ – २५

उरण- ५० – २०

कर्जत- ८ – ०

खोपोली- ३६ – २

पेण- २९ – १३

महाड- २३ – १३

माथेरान- ६ – ०

मुरुड जंजिरा- ७ – ०

म्हसळा- ५ – ०

रोहा- ६ – ०

तळा- २ – ०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलादपूर- २ – ०