सोलापूर : ओमिनी आणि स्कोडा मोटारीची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात चौघाजणांचा मृत्यू झाला. तर अन्य चौघे जखमी झाले. मोहोळ तालुक्यातील आष्टी गावच्या शिवारात सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. विशाल राजाराम माने (वय ३५), सिध्दार्थ सूर्यवंशी (वय ६ महिने,  जगूबाई धनाजी सूर्यवंशी (वय ५५) आणि सुब्राव पांडुरंग बाबर (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा >>> सोलापूरच्या लक्ष्मी मिलची १२५ वर्षांची जुनी चिमणी अखेर जमीनदोस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतीक्षा पांडुरंग बाबर, अस्मिता विशाल माने, ऋतुजा विशाल माने आणि सृष्टी आण्णा सूर्यवंशी या चारजणी जखमी झाल्या. हे सर्वजण सातारा जिल्ह्यातील खटाव व मायनी भागातील राहणारे आहेत. यासंदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओमिनी मोटारीतून (एमएच १२ एचएफ ३४९६) जखमी व मृत पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. तर स्कोडा मोटार (एमएच ०१ बीके ८५८२) ही  पंढरपूरहून मोहोळ तालुक्यातील शेटफळच्या दिशेने दिशेने निघाली होती. आष्टी शिवारात दोन्ही मोटारी एकमेकांना समोरासमोर धडकली. पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.