कोयनेत ४ टीएमसीची वाढ; धरणांचा पाणीसाठा ८० टक्के

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, गेल्या २४ तासात धरणाच्या पाणीसाठय़ात ४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांच्या काठावर पावसाची रिपरिप कायम असल्याने पाटण व कराड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, गेल्या २४ तासात धरणाच्या पाणीसाठय़ात ४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांच्या काठावर पावसाची रिपरिप कायम असल्याने पाटण व कराड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत आहे. गेल्या सलग २० दिवसातील दमदार पावसाने कोयना शिवसागरात सुमारे ४८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगामाला दिलासा मिळताना जलसिंचन प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या ३ आठवडय़ातील पावसाने दुष्काळाची भीती नाहीशी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पांचा पाणीसाठा सुमारे ८० टक्के झाला आहे. सध्या -कोयना शिवसागरात सुमारे ६२ टीएमसी म्हणजेच ५९ टक्के पाणीसाठा आहे. धरणात प्रतिसेकंद ४० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान,  वारणा, राधानगरी व तारळी प्रकल्पातून पाणी सोडणे सुरूच आहे.
गेल्या ३६ तासात कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात २१६ एकूण २,८४६, महाबळेश्वर विभागात २६६ एकूण २,५८१ तर नवजा विभागात २०२ एकूण ३,३७१ मि. मी.पावसाची नोंद झाली आहे. हा सरासरी पाऊस २,९३२.६६ मि. मी. आहे. त्यात धरणक्षेत्रातील पाथरपुंज येथे सर्वाधिक ४,०३८ मि. मी. पाऊस कोसळला आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत पाटण तालुक्यात सरासरी ४१.०८ एकूण १,०२०.२५ तर, कराड तालुक्यात ८.३३ एकूण ३०६.४३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोयना नदीवरील पाटणनजीकचा संगमनगर धक्कापूल पाण्याखालीच असून, कराडनजीकच्या खोडशी वळण बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 4 tmc increase in koyna 80 water in dams

ताज्या बातम्या