मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी आणखी ६० फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी ते ठोकूर दरम्यान या फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी कोकणासाठी १०६ जादा फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.

एलटीटी ते ठोकूरदरम्यानच्या ६० फेऱ्यांचे आरक्षण ९ जुलैपासून करता येणार आहे. गाडी क्रमांक ०११५३ एलटीटीहून १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान दररोज रात्री १०.१५ वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक ०११५४ ठोकूर येथून १४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी ७.३० वाजता सुटणार आहे.

या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभव वाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुंमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मोकाम्बिका रोड, भैंदुर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल येथे थांबा देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.