औरंगाबादमध्ये स्विफ्ट व तव्हेरा गाडीत झालेल्या धडकेत ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमधे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सोमवारी रात्री उशीरा औरंगाबाद – नगर रोडवर स्विफ्ट गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने समोरुन येणा-या तव्हेरा गाडीला धडक दिली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये गंगापूर पोलीस ठाण्याचे अशोक थोरात, भगवान दुधे व मेहबूब सय्यद या तीन पोलिसांचा समावेश आहे. तवेरातून प्रवास करत असलेल्या दौलताबाद येथील फळ विक्रेत्याचाही यात मृत्यू झाला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2015 रोजी प्रकाशित
भीषण अपघातात तीन पोलिसांसह सातजणांचा मृत्यू
औरंगाबादमध्ये स्विफ्ट व तव्हेरा गाडीत झालेल्या धडकेत ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमधे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 08-09-2015 at 10:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 dead swift tavera accident