रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावातील बेपत्ता झालेल्या ७० वर्षीय बानू फकीर मोहमद जुवळे या महिलेचे गावातील एक महिला आणि दोन पुरुष व्यक्तींनी साडेतीन तोळे  सोन्याचे दागिने बळकवण्यासाठी  अपहरण करून तीचा गळा दाबून निर्दयीपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलातील खोल दरीत फेकून दिला. संगमेश्वर पोलिसांनी वेगाने तपास व चौकशीचे चक्रे फिरवत एका आरोपीचे मुसक्या आवळल्या असून फरार दोन आरोपींचा शोध घेत आहेत. खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेने कडवई गावांसह संपूर्ण संगमेश्वर तालुका हादरला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे राहणा-या बानू फकीर मोहमद जुवळे (वय ७०) या २ मे २०२५ रोजी पासून बेपत्ता असल्याची फिर्याद चुलत सून मुनीरा बशीर जुवळे कडवई, उभीवाडी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात ९ मे २०२५ रोजी दाखल केली होती. त्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तपास सुरु केला. संगमेश्वर पोलिसांनी नापत्ता बानू जुवळे यांचा तपास करण्याच्या दृष्टीने याकामी त्यांना मोबाईल नंबरचे  तांत्रिक विश्लेषण आणि सी. सी. टीव्ही फुटेजची मदत मिळाली.
           
याप्रकरणी हाजिरा मुसा माखजनकर, रिजवान महामूद जुवळे दोन्ही राहणार कडवई,उभीवाडी तसेच हुमायू शकील काजी राहणार फणसवणे या तिघांनी २ मे रोजी एमएच ०५ एएक्स ९०९८ या नॅनो गाडीतून बानू जुवळे यांना नेत असल्याचे  सी. सी. टीव्ही फुटेज मध्ये दिसून आले. त्यामुळे मुनीरा जुवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बानू जुवळे याचे अपहरण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी  संगमेश्वर पोलीस ठाणे गुन्हा. रजि. नं  ७७/२०२५५ बी.एन.एस कलम १४०(३).३ (५) प्रमाणे दि. १९ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यातील आरोपी  रिजवान महामूद जुवळे हा सीवुड मुंबई येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाल्या वरून संगमेश्वर पोलिसांच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफिने त्याच्या मुसक्या आवळून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे आणले. आरोपी रिजवान जुवळे याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपी रिजवान महामुद जुवळे याने गुन्ह्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुमायु शकील काझी व हाजीरा मुसा माखजनकर या तिघांनी मिळून एकमेकाचे संगनमताने बानु फकीर मोहंमद जुवळे हिचे अपहरण केल्याचे कबूल करत हिमायू काझी आणि रिजवान जुवळे या दोघां नरामधानी तीचा गळा आवळून ठार मारून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी बानू जुवळे हिचा  मृतदेह अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नॅनो गाडीतून कडवई ते कुंभारखणी बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला खिंडीतील जंगलमय भागात खोल दरीत फेकून दिल्याचे आरोपी रिजवान जुवळे याने कबूल केले. २३ मे रोजी पोलीसांना घटनास्थळी नेवून अपहरण करून ठार मारण्यात आलेल्या बानू जुवळे याचे प्रेत दाखवले. या तिघांनी ३० ग्राम ४५० मिली दागिण्याच्या आमिषाने ७० वर्षीय वयोवृद्ध बानू जुवळे या महिलेचा नाहक  बळी घेतला. ते दागिने ज्या सोनाराला विकले होते. ते दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.