पिंपरी-चिंचवड: पुण्यातील मुळशी मध्ये जमिनीच्या वादात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील असलेले संदीप भोईर यांनी शेतकऱ्याला पिस्तूल दाखवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेतकऱ्याने न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना अनाधिकृतपणे, नांगरणी केल्याचा आरोप करत पाहणी साठी गेलो, तेव्हा वकील भोईर यांच्यावर शेतकऱ्यासह इतरांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तस तक्रारीत नमूद करण्यात आल आहे. अखेर हिंजवडी पोलीस ठाण्यात वकील संदीप हिरामण भोईर आणि शब्बीर मुलाणी यांनी परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळशी येथे जमिनीच्या ताब्यावरून काही जणांनी शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत दमदाटी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण हिंजवडी पोलीस ठाण्यातील मुळशी येथील असल्याचे समोर आल आहे. या प्रकरणात शेतकरी आणि पिस्तूल दाखवणारे संदीप भोईर यांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे.

शब्बीर करीमभाई मुलाणी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल आहे, शुक्रवारी आम्ही आमच्या घराच्या समोर बसलो असताना वहिवाट सर्वे नं.१९/१ एक मध्ये आरोपी प्लॉट पाहत असताना आमच्याकडे आले. आम्ही त्यांना विचारलं, ही आमची जागा आहे. तुम्ही इथे काय करता. याचाच राग मनात धरून परवानाधारक पिस्तूल दाखवून मला आणि मुलीला धमकी दिली. इतर तीन ते चार जणांनी मुलीला शिवीगाळ करून दमदाटी केली असं तक्रारीत म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर वकील संदीप हिरामण भोईर यांनी देखील शब्बीर मुलाणी आणि त्यांचे इतर चार ते पाच साथीदारांच्या विरोधात तक्रार दिली आहे. १६ एकर च प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ते जैसे ते आहे. असं असताना आरोपी हे बेकायदेशीर जमाव जमवून अनधिकृतरित्या मिळकतीचे कंपाऊंडचे नुकसान करून ट्रॅक्टरने नांगरणी करत होते. त्यांना आम्ही समजावण्यासाठी गेल्यानंतर याचाच राग मनात धरून त्यांनी लाकडी दांडके आणि कुऱ्हाड घेऊन दगडफेक केली. शिवीगाळ करून धमकी देखील दिली. असं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.