शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवत आणि शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज दिली जावी, या मागणीसाठी एका शेतकरी पुत्राने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे.

शेतीली दिवसा लाईट मिळणेबाबत असा विषय मांडत, ”गेली पाच-सहा दिवस राजू शेट्टी कोल्हापूर महावितरण कार्यालयाच्या बाहेर याबाबत आंदोलन करत आहेत. त्याची दखल घेतली नाही. शेतकरी पुत्र म्हणून मी माझ्या रक्ताने या पत्राद्वारे विनंती करतो की, शेतकऱ्याला दिवसा दहा तास वीज मिळावी.” असा मजकूर या पत्रात लिहिलेला आहे. शिवाय, आपला शेतकरी पुत्र नितेश कोगनोसे असं पत्राच्या खाली नाव देखील लिहिलं आहे.

महावितरण अधिकार्‍याच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडला साप ; आंदोलकांवर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल शासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांसमोर काचेच्या बरणीतून साप ठेवण्यात आला होता. तर आज त्याही पुढे जात इचलकरंजी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या टेबलवर साप सोडण्यात आला. वीजप्रश्नी तातडीने निर्णय न घेतल्यास सापासह अन्य वन्य प्राणी शासकीय कार्यालयात सोडले जातील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.