scorecardresearch

सांगली : ‘संशयित धर्म प्रसारकाच्या संपत्ती व कारभाराची चौकशी करा’; आटपाडीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा

आटपाडीमध्ये रूग्णांवर मंत्रतंत्र करून धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक गेळे यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सांगली : ‘संशयित धर्म प्रसारकाच्या संपत्ती व कारभाराची चौकशी करा’; आटपाडीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा

आटपाडी पोलीसांनी जादूटोणा प्रकरणी अटक केलेल्या संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळेच्या कारभाराची व संपत्तीची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने शुक्रवारी मोर्चाही काढण्यात आला. आटपाडीमध्ये रूग्णांवर मंत्रतंत्र करून धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक गेळे यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र गेळे यांच्या आतापर्यंतच्या या सगळ्या कारभाराची, संपत्तीची चौकशी करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आटपाडीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा- “राज ठाकरेंचा डंका…” मनसेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी चित्रपटाचं भारतातलं प्रदर्शन रद्द

गेळे यांने पत्नी अश्‍विनीसह रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जाउन रूग्ण तरूणीच्या कपाळावर हात ठेवून मंत्राद्बारे उपचार करण्याची ध्वनीचित्रफित काही दिवसांपूर्वी समोर आल्याने हा प्रकार धर्मातराचा असल्याचा आरोप हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी केला होता. या प्रकरणी गेळे दांपत्याविरूध्द जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. रविवारी गेळे दांपत्याला अटक करून कठोर कारवाई व्हावी यासाठी एक दिवस बंद ही पाळण्यात आला होता. आता ख्रिस्ती धर्म प्रसारक असलेल्या गेळे यांच्या कारभाराची, संपत्तीची चौकशी करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आटपाडीत मोर्चा काढण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 14:16 IST

संबंधित बातम्या

व्हिडिओ