कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या कामाचे धिंडवडे काढत अनोखे आंदोलन करण्यात आले. रोलर पुढे लावून डांबरीकरणाच्या बॉयलर गाड्यावर बसवून नवपरिणीत दाम्पत्यांची वरात काढण्यात आली.

कोल्हापूर शहरात रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील आयटी कंपनीमध्ये नोकरीला असलेले प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते संकेत जोशी आणि सोनाली नायक हे विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांची शहरातून अनोखी वरात काढण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासबाग प्रिन्स क्लबने वरातीत पुढच्या बाजूस रोलर लावला होता. नवदाम्पत्यांना मागील गाडीवर बसवण्यात आले होते. लेझीम, हालगी, सनईच्या तालावर शहराच्या विविध भागांमध्ये ही वरात निघाली. या गाडीवर कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढणारा मजकूर फलकावर लिहिला होता. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा होत होती. याचे नियोजन सचिन साबळे, अभिजित पवार, विशाल कोळेकर, सचिन पवार, नामदेव माळी, रमेश मोरे, अशोक पवार, बंडू हावळ, विराज जगताप आदींनी केले.