सांगली : कवठेमहांकाळ बसस्थानकावर भरदिवसा तरुणाचा खून करण्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला असून या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळा धोडिबा कोळेकर (वय २३ रा.आरेवाडी) हा तरुण गावी जाण्यासाठी बसस्थानकावर बसला होता. यावेळी अचानक आलेल्या चौघांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने वार केले. भरदिवसा झालेल्या या प्रकाराने बसस्थानकावर असलेल्या प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार बसस्थानकामध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍यामध्ये कैद झाला. या चित्रफितीच्या माध्यमातून पोलिसांनी हल्लेखोरांना तत्काळ ताब्यात घेतले.

हेही वाचा – “मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का?” उद्धव ठाकरेंच्या टीकेला बांगर प्रत्युत्तर देत म्हणाले…

हेही वाचा – सांगली : तरसाच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

या प्रकरणी श्रीकांत माळी (रांजणी), सुशांत धडस, रोहन उर्फ डिंग्या चंदनशिवे आणि रोहित वनखंडे (सर्व रा. कवठेमहांकाळ) या चौघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रोहित वनखंडे यांनी बाकड्यावर बसलेल्या धुळा कोळेकर याला लाथ मारून खाली पाडून शिवीगाळ केली, तर अन्य तिघांनी त्याच्यावर चाकूने वार केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man murder at kavthemahankal bus stop ssb
First published on: 27-08-2023 at 18:08 IST