मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच आपल्या शिष्टमंडळासह डाव्होस दौऱ्यावर गेले होते. चार दिवसांच्या या डाव्होस दौऱ्यात साधारणत: ३५ ते ४० कोटी रुपये अंदाजित खर्च झाला. म्हणजेच दिवसाला साडेसात ते दहा कोटी खर्च झाला, असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा हस्यास्पद होता, असं विधानही आदित्य ठाकरेंनी केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डाव्होस दौऱ्यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “डाव्होस दौऱ्यातून महाराष्ट्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक आली, असा दावा सरकारकडून जात आहे. डाव्होसमध्ये महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता, हा कार्यक्रम एकंदर चार दिवसांचा असेल असं आम्हाला वाटतं. कारण १६ ते २० जानेवारी असा हा कार्यक्रम ठरवला होता. या कार्यक्रमासाठी आम्हाला कळालेला अंदाजित खर्च साधारणपणे ३५ ते ४० कोटींच्या घरात आहे. चार दिवसांसाठी ४० कोटी खर्च केले. यामध्ये आणखी नवीन खर्च वाढू शकतो, तिकडे मित्रपरिवार गेला होता? तिथे कोणत्या गाड्या वापरल्या? याचा तपशील पुढे येणं आवश्यक आहे.”

हेही वाचा- “…अन्यथा स्वत:चा पक्ष काढण्याची हिंमतच झाली नसती”, बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना राज ठाकरेंचं विधान!

“त्यांनी प्रत्येक दिवसाला दहा कोटी रुपये खर्च केला आहे. त्यांनी डाव्होसमध्ये मोठं पव्हेलियन घेतलं असेल. पण सरकारमध्ये खर्च कसा दाखवायचा हे त्यांना चांगलं माहीत आहे. अजून एक महत्त्वाचे म्हणजे, डाव्होसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. यावर दोन ते अडीच कोटी खर्च झाला असेल. हा सर्व खर्च राज्यावर आला असेल. माझा चार्टर्ड विमानाला विरोध नाही. पण तुम्ही कमर्शिअल विमानाऐवजी चार्टर्ड विमानाचा वापर लवकर पोहोचण्यासाठी करता. पण एकनाथ शिंदे उशिरा पोहोचले,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

हेही वाचा- Escort Service in Davos: डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला प्रचंड मागणी; अतिश्रीमंतांनी केलं ‘जीवाचं डाव्होस’!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “१६ जानेवारीला डाव्होस दौऱ्याचा पहिला दिवस होता. यादिवशी अनेक बैठका आणि उद्योजकांच्या भेटीगाठी होणार होत्या. त्यासाठी मुख्यमंत्री सकाळी लवकर तिथे पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते सायंकाळी साडेचार-पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचले. मागच्या वर्षी २२ मे २०२२ ला आम्ही सकाळी साडेआठ वाजता आमच्या पव्हेलियनचं उद्घाटन केलं होतं. पण एकनाथ शिंदेंनी सायंकाळी साडेसहा-सात वाजता उद्घाटन केलं. त्यामुळे आधीच्या नियोजित बैठका रद्द झाल्या. त्यांच्या बैठकीचे फोटो किंवा इतर पुरावे आम्हाला कुठेही दिसले नाहीत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत अधिकृत कोण होतं आणि अनधिकृत कोण होतं? मित्रपरिवार सोबत गेला होता का? ते कुठे राहिले? त्यांचा खर्च कोणी केला? त्यांच्या गाड्यांचा खर्च कोणी केला? हे सगळं लोकांसमोर येणं गरजेचं आहे.”