Kunal Kamra Eknath Shinde Controversy Updates : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये जाऊन तोडफोड केली. त्यावर युवानेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे.

“विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणं सादर केलं तो कॉमेडी शोचा स्टेज मिंधेंच्या भ्याड टोळीने तोडला. जे गाणं १००% खरे होते”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित भ्याडच प्रतिक्रिया देईल”, असंही ते म्हणाले.

“राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का? एकनाथ मिंधे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न केला”, अशी टीकाही त्यांनी केली.

शोमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे शिंदे यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी रविवारी रात्री खार येथील द युनिकॉन्टिनेंटल मुंबई हॉटेलवर हल्ला केला आणि तोडफोड केली. तसंच, या समर्थकांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्याला थेट धमकीही दिली आहे. कामराविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यासाठी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते विविध पोलिस ठाण्याबाहेर जमले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुर्च्या फेकल्या अन् लाईट्ही फोडल्या

कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळले.