विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा-शिंदे गटावर मात केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता. या जागेवर विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सत्यजित तांबेंच्या या बंडखोरीमागे भाजपाचाच हात आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जात होता. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. नाशिक जागेसाठी भाजपाने केलेली खेळी आमच्या जिव्हारी लागलेली आहे. त्या भागातून आमचा एक नेता त्यांनी नेला असला तरी तेथून आगामी काळात आम्ही ५० आमदार निर्माण करणार, असे नाना पटोले म्हणाले. ते आज (३ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> MLC Election 2023 : भाजपाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीला मदत? नाना पटोलेंच्या विधानानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “अनेक नेत्यांनी…”

त्यांनी आमचा एक नेता नेला, आम्ही…

“भाजपा दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडताना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल असे सूचक विधान मी केले होते. आज अमरावती, नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपाच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचे घर तोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्रास देण्याचा प्रयत्न झाला. हाच त्रास आमच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यांनी आमचा एक नेता नेला. पुढच्या काळात नाशिकमधून मी काँग्रेसचे पन्नास आमदार निर्माण करेन. तशी रणनीती आम्ही आखली आहे. त्या रणनीतीमध्ये आम्हाला यश येईल,” असे नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा >>> सत्यजित तांबेंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार? नाना पटोलेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले “आम्ही त्यांना…”

सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मदत केली, असे विधान अजित पवार यांनी केल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले. “अजित पवार यांनी एक चांगला खुलासा केला आहे. राष्ट्रवादीने सत्यजित तांबे यांना मदत केली आहे, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार ही जबाबदार व्यक्ती आहेत. एक जबाबदारी व्यक्ती असे बोलत असेल तर आमच्या मनात चिंता आहे. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यात या सर्व बाबींचा खुलासा होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पूर्ण ताकद दिली असती, तर तो उमेदवार निवडून आला असता,” असेही नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aana patole said will create 50 mla from nashik region because of satyajeet tambe revolt prd
First published on: 03-02-2023 at 14:18 IST