aap-workers-celebrate-in-kolhapur-in-joy-of-victory-in-delhi-municipal-corporation- | Loksatta

दिल्ली महापालिकेत विजय; ‘आप’कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात जल्लोष

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे दिल्ली विधानसभेपाठोपाठ महापालिकेतही त्यांची सत्ता आली आहे.

दिल्ली महापालिकेत विजय; ‘आप’कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात जल्लोष
दिल्ली महापालिकेत विजय मिळाल्याच्या आनंदात कोल्हापूरात आप कार्यकर्त्यांचा जल्लोष

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने १३४ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. विजयानंतर आपच्या आप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व साखर वाटून जल्लोष साजरा केला.

हेही वाचा- विश्लेषण: दिल्लीत ‘आप’चे ‘डबल इंजिन’! दिल्ली महापालिका निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम?

दिल्ली महापालिकेच्या निवडणुका गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित होत्या. भाजपाने निवडणुकीत अनेक क्लृप्त्या वापरल्या होत्या. तरीही दिल्लीच्या मतदारांनी भाजपच्या सत्तेला धक्का देवून ‘आप’ला बहुमत दिले. कोल्हापूर महापालिकेत देखील आम्ही ताकदीने उतरणार असून दिल्ली विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज आहोत, असे ‘आप’चे प्रदेश प्रवक्ते, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी बुधवारी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:32 IST
Next Story
बोम्मईंच्या प्रतिमेला जोडे!; कर्नाटकमधील घडामोडींचे बुलढाण्यात पडसाद