मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. शिंदे आगामी काळात औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्ही काळे झेंडे दाखवले तर एकनाथ शिंदे त्यांना सरळ करतील, असे सत्तार म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> व्यसन करू नकोस म्हटल्याने राग अनावर, नऊ जणांनी केला तरुणाचा खून

“सरकारला कायदा, नियम तसेच धोरण ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कायद्यानुसार इतर तसेच आपल्या देशात शहरांचे नामांतर झालेले आहे. एकदा कायद्याने मंजुरी दिली तर औरंगाबादच्या नामकरणाला कोणतीही अडचण येणार नाही. झेंडे कुठे आणि कसे दाखवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र त्यांनी काळे झेंडे दाखवले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दांडे त्यांना सरळ करतील,” असा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

हेही वाचा >> “…मला चिंता वाटतेय” न्यायालयाच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचे विधान

इम्तियाज जलील काय म्हणाले होते?

खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. “मुख्यमंत्र्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करणार आहोत. बसून चर्चा करुयात असे मला पोलिसांनी सांगितले होते. मात्र काही प्रश्न हे बसून नव्हे तर रस्त्यावर उतरुन सोडवले जातात. औरंगाबादच्या नामकरणाचा विषय आहे. तसे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, या दोन कारणांमुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. सर्वपक्षीय समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar said will give answer if imtiaz jaleel shows black flag to cm eknath shinde prd
First published on: 29-07-2022 at 21:57 IST