औरंगाबाद : कंटेनर – मोटारीच्या धडकेत तीन ठार

अपघात होताच कंटेनरचालक पळून गेला.

(सांकेतिक छायाचित्र)

पठण-औरंगाबाद रस्त्यावरील इसारवाडी फाट्याजवळ कंटेनर व मोटारीच्या झालेल्या अपघातात अहमदनगर जिल्ह्यतील शेवगाव तालुक्यातील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.

औरंगाबाद येथून भरधाव पठणकडे मशिनरी घेऊन जाणारे कंटेनर (जीजे०६-एझेड ६८५१) व मोटार (एमएच१२- सीके३४६८) यांची धडक झाली. यामध्ये मोटार चालक बाळासाहेब निवृती डाके (वय ४५), अंबिका बाळासाहेब डाके (वय ४०, दोघे रा. ढोरजळगाव ता. शेवगाव) हे पती-पत्नी व बाळासाहेब डाके यांची सासू सुमन रघुनाथ नरवडे (वय ६५) या जागीच ठार झाल्या. अपघात होताच कंटेनरचालक पळून गेला. या अपघाताची माहिती इसारवाडी येथील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी पठण एमआयडीसी पोलीस ठाण्याला माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने मोटारीमधील मृत व्यक्तींना बाहेर काढून पठण येथील शासकीय रुग्णालयात हलवले. देवीदास डाके यांच्या फिर्यादीवरून कंटेनरचालकाविरुद्ध एमआयडीसी पठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accident at aurangabad pathan road three died jud

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या