सातारा : खंबाटकी बोगद्याजवळ विचित्र अपघात; एक ठार, सहा जखमी

दिवाळी सुट्टी संपल्याने पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी महामार्गावर आहे. अपघात स्थळापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Accident near Satara

पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्यानजीक धोम बलकवडी कालव्याजवळील उतारावर दुचाकीस्वार घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. याच परिसरात उतारावरून पुण्याकडे भरधाव वेगात जात असणाऱ्या मालट्रकने तीन गाड्यांना ठोकरल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले.

साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्यानजीक धोम बलकवडी कालव्याजवळील उतारावर दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे (रा. सासवड जि. पुणे) हा घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत या अपघातातील दुचाकी पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला घेत मृतास रुग्णवाहिकेमधून खंडाळा रुग्णालयात पाठवले. दोन्ही अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाले.

दरम्यान याच परिसरात उतारावरून भरधाव वेगात आलेला मालट्रक क्र .(केए-२७ – ए– ९०१९) ने डस्टर, क्रेटा व इर्टिका कारला धडक दिली. यामध्ये क्रेटा कारचा चक्काचूर झाला. खंडाळा व महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. जखमी सहा जणांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. दिवाळी सुट्टी संपल्याने पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी महामार्गावर आहे. अपघात स्थळापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व जखमी खराडी (पुणे) येथील आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. जखमी लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी मदत केली. अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accident near khambatki tunnel one biker dead 6 injured vsk

ताज्या बातम्या