अलिबाग : मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अमृतांजन पूला नजीक बोर घाट उतरताना भरधाव वेगातील एका माल वाहतूक ट्रक ने एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर 12 जण जख्मी झाले जख्मीं पैकी 4 जणांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला.
पुणे कडून मुंबई कडे भरधाव वेगात निघालेल्या मालवाहतूक ट्रक ने ईनोव्हा, अर्टिका, रिक्षा, टाटा पंच व एका हायवे पेट्रोलिंग चे वाहन अशा पाच वाहनांना धडक दिली हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये निलेश लगड व त्यांची दहा वर्षांची मुलगी श्राव्या लगड अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त समजताच महामार्गावरील पोलीस, लोणावळा,खंडाळा पोलीस यांच्या सह खोपोली येथील अपघातातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेचे स्वयंसेवक आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट सुरक्षा बल, पवना आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स सर्विसेस या सर्व यंत्रणा अपघात स्थळी दाखल होऊन मदत कार्य केले त्यामुळे जख्मींना योग्य वेळेत रूग्णालयात दाखल करण्यात आले काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर सुरू करण्यात आली.