दहा वर्षापुर्वी केलेल्या लैंगिक अत्याचाराचा राग मनात धरुन विठ्ठल मदने याला कुऱ्हाडीचे घाव घालून ठार करण्यात आले आहे. परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथे सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यातील अरोपीस पोलीसांनी तीन तासाच्या आत सापळा लावुन आटक केली आहे.

परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील लैंगिक अत्याचार  प्रकरणातील आरोपी विठ्ठल मदने ( वय ३५ )  याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. विठ्ठल मदने याने दहा वर्षा पुर्वी गावातीलच एका व्यक्तीच्या बहिणीला पळवून नेवुन अत्याचार केला होता. या प्रकरणी विठ्ठल मदने याच्या विरोधात परंडा पोलिसात लैंगिक अत्याचाराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, जिल्ह्यात कडकडीत बंद; संचारबंदीचे आदेश, कर्नाटकातील बस पेटवून संताप व्यक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेनंतर  विठ्ठल मदने हा पुणे जिल्हयातील राहू पिंपळगाव येथे राहत होता. मदने याच्यावर १० वर्षा पुर्वी दाखल झालेल्या गुन्हाची परंडा न्यायालयात मंगळवार ३१ ऑक्टोबर ही तारीख होती. तारखेसाठी विठ्ठल मदने हा ढगपिपरी गावात आला होता. दरम्यान सोन्या चौधरीला ( वय २५ ) विठ्ठल मदने तारखेसाठी गावात आल्याची माहिती मिळाली. दहा वर्षा पुर्वीचा राग मनात धरून सोन्या  चौधरी याने सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास विठ्ठल मदने याच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. मदने यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत झाल्याचे घोषीत केले . मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मयताचा भाऊ अनंता मदने याच्या फियादीवरून सोन्या चौधरीच्या विरोधात परंडा पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.