सातारा: मुनावळे हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाण असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे दोन दिवसीय सातारा दौऱ्यावर असून त्यांनी कोयना धरणावरील जागतिक दर्जाच्या मुनावळे जलपर्यटन केंद्रावर सहकुटुंब बोटिंगचा आनंद लुटला. वासोटा परिसरात त्यांनी नौकाविहार केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांचे मुनावळे येथे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल सध्या महाबळेश्वर येथे दिवाळीच्या सुट्टीसाठी दोन दिवसीय मुक्कामी आले आहेत.
राज्यपाल म्हणाले की, मुनावळे येथील कोयना जलपर्यटन केंद्राला भेट देण्याचे सौभाग्य मला लाभले. सर्वात सुंदर स्वच्छ पाणी असलेले हे ठिकाण पाहून मन प्रसन्न झाले. हा भारतातील सर्वात सुंदर परिसर आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कोयना जलपर्यटन केंद्र मुनावळेला भेट देण्याचे सौभाग्य मला लाभले. सर्वात सुंदर, स्वच्छ पाणी असलेले हे ठिकाण पाहून मन प्रसन्न झाले. हा भारतातील सर्वात सुंदर परिसर असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुनावळे येथे काढले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की महाराष्ट्र शासन या ठिकाणी पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसात लोकांना आनंद देणारे हे ठिकाण बनेल.
राज्यपाल मुनावळे येथे सहकुटुंब पोहचले. त्यानंतर या ठिकाणी एम टी डी सी मार्फत सुरू असलेल्या जलपर्यटन केंद्रातील बोटींमधून कोयनेच्या निळ्याशार पाण्यात सुमारे अर्धा तास जलपर्यटन केले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.
या वेळी राजूभैय्या भोसले, फिरोज पठाण, डॉ. दिपक थोरात, प्रांताधिकारी आशिष बारकूल, विकास व्यवहारे, तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे नायब तहसीलदार संजय बैलकर, एम टी डी सी चे मुख्य अधिकारी हनुमंत हेडे, दिग्विजय पाटील, गोविंद खवणेकर, सरपंच निलेश भोसले किरण भोसले संतोष भोसले आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कडून परिसरातील माहिती घेतली. तसेच मुनावळे येथे होत असलेल्या या अत्याधुनिक जलपर्यटन प्रकल्पाची माहिती दिली. तसेच कोकणाला जोडणारे रस्ते, पूल आदींबाबत माहिती देत पर्यटन वाढीसाठी चाललेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी या परिसराचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांबरोबर छायाचित्र घेतले.
