लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : आटपाडी शहरातील सांगोला चौक येथे अज्ञातांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने पहाटे आंबेडकर यांचा पुतळा हटवला असल्याने पहाटे पासून पुतळा बसवलेल्या ठिकाणी आंबेडकर वादी संघटनानी ठाण मांडून बसले आहेत.

सांगोलाकडून येणारा रोड, दिघंचीकडून येणाऱ्या रोडवर सांगोला चौकात हा ठिय्या मारण्यात आला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात तणावाची स्थिती असली तरी नियंत्रणात आहे.

शुक्रवारी असाच प्रकार रामापूर ता. कडेगाव येथे घडला होता. अज्ञाताकडून महापुरुषाचा पुतळा विना परवाना प्रतिष्ठापित केला होता. प्रशासनाने काढल्यानंतर बौद पाळण्यात आला‌ अखेर ग्रामसभेत याबाबत निर्णय घेण्याचे मान्य झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Story img Loader