कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा उफाळून आला आहे. यामुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. अशात आता कर्नाटक सीमावादाबरोबच गुजरात सीमावादही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील गावांनी गुजराजमध्ये जाण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा – “मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अपमान केल्यास…”, गुलाबराव पाटील संतप्त

दरम्यान, आज या मुद्द्यावर गुजरात सीमेवर असलेल्या गावांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावकऱ्यांनी महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी गुजरातमध्ये जाणाची मागणी केली. गुजरातमधील आदिवासी बांधवांना चांगल्या सुविधा मिळत आहेत, आमच्या गावात आजही आरोग्य, शिक्षण असे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप आहे, अशी भावना येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – VIDEO: “संजय राऊतांच्या तोंडात त्यांच्या आईने…”, आमदार गायकवाडांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

याबैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या प्रश्न समजून घेत, गावकऱ्यांचे म्हणणे शासनदरबारी मांडणार असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच येथील गावकऱ्यांनी गुजरातमध्ये जाण्याचा आग्रह सोडावा, असे आवाहनही त्यांन त्यांनी केले.

हेही वाचा – ‘भाजपा सर्वाधित ग्रामपंचायती जिंकेल’; भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाचे म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सुरगाणा तालुक्यातील सीमेलगतची गावे गुजरातला जोडावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी केली होती. याबाबतचे पत्र त्यांनी तहसीलदारांना दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी याबत सारवासारव केली होती.