अहिल्यानगर : एका अठरा वर्षीय विवाहितेवर घरात घुसून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी उपनगरात घडली. पीडितेवर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्याचार करणारे संशयित तरुण पसार झाले आहेत. कोतवाली पोलिसांनी सायंकाळी चार अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उपनगरातील वसाहतीत भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरातही खळबळ उडाली आहे. विवाहिता सकाळी घरासमोर काम करत असताना, चार अनोळखी तरुण दोन दुचाकीवरून आले. यातील एक संशयित आरोपी विवाहितेच्या दिशेने धावत आला. तिला उचलून घरात घेऊन गेला व तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर इतर तीन संशयित आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या संशयितांनी लाल रंगाच्या टोप्या, मेहंदी रंगाचे मास्क व विविधरंगी कपडे परिधान केले होते. सर्व संशयित आरोपी अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड व तेजश्री थोरात यांनी घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली तसेच पीडितेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला.