Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. स्वतः अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे मंजूर केले असले तरी भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत थेट संकेत दिलेले नाहीत. दोन दिवसांनी निर्णय जाहीर करू, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. यात आता एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनीही भाष्य केले असून भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर त्यांनी टीका केली.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना वारिस पठाण म्हणाले, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे आता भाजपामध्ये जाणार असल्याचे कळते. हा आता पॅटर्नच झाला आहे. हे तेच लोक आहेत, जे एमआयएमला भाजपाची बी-टीम म्हणून हिणवत होते. आता मला सांगा बी-टीम कोण आहे? त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मतं मिळवली आणि आता ते मतं भाजपाच्या पारड्यात टाकत आहेत. भाजपाही दावा करत आहे की, अनेक नेते त्यांच्या पक्षात येणार आहेत. मग धर्मनिरपेक्षतेचे पाईक असलेले ते सर्व नेते गेले कुठे? ते नेते आता बोलत का नाहीत?”

“…म्हणून मी राजीनामा दिला”, अशोक चव्हाणांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचा निर्णय कधी आणि का घेतला?

मागच्या काही दिवसांपासून कुणी शिंदे गटात गेलं, कुणी अजित पवार गटात जात आहे आणि आता चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहेत. हेच लोक आमच्यावर बी-टीम असल्याचा आरोप करत होते. म्हणून आम्ही सांगतो, तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करत असताना आधी स्वतःकडेही पाहा. हीच तुमची धर्मनिरपेक्ष वृत्ती आहे का? असा सवाल वारिस पठाण यांनी उपस्थित केला.

शिंदे-फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यातील सौहार्द उघड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळाले. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर अशोक चव्हाण आणि त्यांच्यासह इतर काही आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.