वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबच्या कबरीला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी औरंगजेबच्या कबरीवर फुलंही वाहिली आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या कृत्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातले आहेत. एखाद्या व्यक्तीने त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून काय करावं? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण असं कुणी केलं तर शिवप्रेमींना आवडत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Prakash Ambedkar Slams PM Modi
पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून १७ लाख कुटुंबांनी देश सोडला, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाने खळबळ
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…

हेही वाचा- वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली औरंगाजेबाच्या कबरीला भेट; म्हणाले, “५० वर्षे…”

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुलं वाहिल्याच्या कृतीविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले, “प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातले आहेत. तसेच ते माजी खासदार व वंचित आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून काय करावं? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. लोकशाहीत संविधानाने हा अधिकार दिला आहे. पण असं कुणी केलं तर ते शिवप्रेमींना आवडत नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हा औरंगजेबाने महाराजांना त्रास दिला होता. इतिहासात ज्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांना ती कृती योग्य वाटत नाही.

हेही वाचा- “सुप्रिया सुळे मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील”, पवार-ठाकरेंच्या प्लॅनबाबत बावनकुळेंचा मोठा दावा

“उद्या तुम्ही पत्रकार म्हणून औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पाहणी केली. तर आम्ही त्याला विरोध करू शकत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तिथे का गेले होते? त्यांच्या मनात काय आहे? हे प्रकाश आंबेडकरच जास्त अधिकारवाणीने सांगू शकतात. याबद्दल प्रकाश आंबेडकर जोपर्यंत स्पष्ट मत व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याबद्दल कळणार नाही. मीही काल संभाजीनगर परिसरात होतो. तेव्हा तिथे दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती, परंतु सायंकाळी ही घटना घडल्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. या गोष्टीमुळे शिवप्रेमी नाराज झाले आहेत,” असंही अजित पवार म्हणाले.