अलीकडील काही दिवसांपासून औरंगाजेबाचे स्टेटस ठेवल्यावरून ठिकठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला आहे. “औरंगाजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का? औरंगाजेबाचं राज्य का आलं, हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. जयचंद इथे आले आणि राज्या-राज्यात झाले. त्यामुळे जयचंदांना शिव्या घाला. औरंगाजेबाला शिव्या कशाला घालता,” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
What Prakash Ambedkar Said?
प्रकाश आंबेडकरांचा दावा, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काम संपलं आहे, पुढच्या दोन महिन्यांत…”
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा

हेही वाचा : “मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी बारामतीत अडवलं होते,” फडणवीसांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

या भेटीनंतर शिवसेनेची कोंडी होऊ शकते? या प्रश्नावर मोजक्या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. “या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही, आम्ही…”; खासदार श्रीकांत शिंदेंचं जाहिरात वादावर वक्तव्य, म्हणाले…

औरंगाजेबाच्या स्टेटसमुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला आहे. याबद्दल विचारल्यावर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर, दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय म्हणजे, होऊ देता म्हणून,” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.