मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही गेले होते. मात्र, या दौऱ्याला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी दांडी मारली आहे. संबंधित आमदारांनी विविध कारणं देत अयोध्या दौऱ्यावर जाणं टाळलं आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. जहाजातून जसे उंदीर पळतात, त्याप्रमाणे सर्व आमदार हळुहळू शिंदे सरकारला सोडून जातील, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं. खडसे यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- “…म्हणून मला लपून राहावं लागलं”, पोलिसांच्या दबावाबद्दल रॅपर राज मुंगासेचा मोठा खुलासा!

शिंदे गटातील आमदारांच्या अस्वस्थतेवर भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांबरोबर अयोध्येला अनेक आमदार गेले नाहीत. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. अपक्ष आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होत नाहीये. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं नेहमी गाजर दाखवलं जातंय. त्यामुळे बच्चू कडूंसारखे आमदार अनेकदा विधानं करत आहेत. आता मंत्रिमडळाचा विस्तार २०२४ नंतरच होणार आहे. म्हणजेच २०२४ च्या निवडणुका झाल्यानंतरच मंत्रीमडळ तयार होईल, अशी उपरोधिक टीका बच्चू कडू यांनी केली आहे.”

हेही वाचा- “अजित पवारांकडून जिवाला धोका”; भाजपा नेत्याच्या तक्रारीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “होय, माझ्याकडून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अनेक आमदार खासगीमध्ये बोलताना सरकारबाबत नाराजीची भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि कोर्टाचा निकाल लागेल. तेव्हा जहाजातून उंदीर जसे पळतात, त्याप्रमाणे हे सगळे आमदार हळुहळू शिंदे सरकारला सोडून जातील,” असं भाकीत एकनाथ खडसे यांनी केलं.