अखेर कोल्हापूर विधान परीषद बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपा उमेदवार अमल महाडीक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता, पक्ष श्रेष्ठींच्या निर्देशप्रमाणे अमल महाडिक हे आपल्या समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहचले होते.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमल महाडिक यांनी म्हटले की,“मी एक भाजपाचा सच्चा कार्यकर्ता आहे, म्हणून ही विधान परिषदेची निवडणूक लढवत होतो. पक्षाने जो आदेश दिला की निवडणूक लढ त्यानुसार निवडणुकीसाठी सामोरं गेलो आणि त्याच पद्धतीने आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश मान्य करून, भाजपाचा आदेश मान्य करून मी आज माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.”

दीड वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला आणि … – धनंजय महाडिक

भाजपा प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी सांगितलं की, “इथून पुढे लगेचच राज्यात जिल्हापरिषद निवडणुका होणार आहेत. अनेक नगरपालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. यामुळे राज्यात समन्वय राहावा, सलोखा रहावा. या दृष्टिकोनातून भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या संदर्बात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरू होती आणि आज त्यानुसार निर्णय झालेला आहे. मुंबई भाजपासाठी खूप महत्वाची जागा होती, ती बिनविरोध झालेली आहे. त्याविरोधात कोल्हापूर बिनविरोध करावी, अशी मागणी होती. परंतु, धुळे-नंदुरबारची जागा देखील आम्हाला मिळाली पाहिजे, ही भूमिका भाजपाच्या नेत्यांनी आग्रही ठेवल्यामुळे आज धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल यांची देखील बिनविरोध करायची म्हणजे भाजपाच्या दोन जागांच्या बदल्यात कोल्हापूरची एक जागा त्यांना द्यावी, हा पक्ष आदेश आज झालेला आहे. दीड वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला आणि त्यांनी ज्या घडामोडी झाल्या त्याची माहिती दिली. या विभागात आम्ही भाजपा आणि मित्रपक्ष यांच्यावतीने अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरलेला होता. शोमिका अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरलेला होता, हे दोन्ही अर्ज आम्ही मागे घेतलेले आहेत. या निवडणुकीत आमचे नेते महादेव महाडिक यांना फडणवीस यांनी फोन करून ही सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत विनय कोरे आणि प्रकाशअण्णा आव्हाडे, सुरेश हळवणकर याचसोबत सर्व जिल्हापरिषद सदस्य, सर्व नगरसेवक यांनी आम्हाला साथ दिली. त्या सर्वांचे देखील आम्ही या निमित्त आभार मानतो. अमल महाडिक आणि शोमिका महाडिक यांचे अर्ज मागे घेतलेल आहेत.”

अखेर कोल्हापूर विधान परिषद बिनविरोध ; अमल महाडिकांनी घेतला अर्ज मागे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “भाजपामध्ये आम्ही सगळी मंडळी आतापर्यंत महाडिक गट म्हणून इथे कार्यरत होतो. आज आम्ही सगळी मंडळी भाजपासोबत आहोत. भाजपामध्ये काम करत आहोत, मी प्रवक्ता आहे आणि सदस्य संख्या या निवडणुकीत आमच्याकडे चांगली झालेली होती. तरी देखील पक्षाचा आदेश म्हणून आपण इथे थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथून पुढे सर्व निवडणुका भाजपाच्या झेंड्याखाली आम्ही लढवणार आहोत.” असंही यावेळी धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवले.