राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटातील आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वाधिक प्रतीक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सातत्याने कॅबिनेटमधील मंत्र्यांना प्रश्न विचारले जात आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुठल्याही नेत्याने अद्याप नक्की तारीख सांगितलेली नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा दावा अनेक आमदारांकडून केला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी अलिकडेच हिंगोली येथे बोलताना असा दावा केला आहे की, मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार होईल तेव्हा त्यांनादेखील मंत्रीपद मिळेल. संतोष बांगर म्हणाले की, आता जो आगामी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्यावळेस शिवसेनेचा हा आमदार १०० टक्के मंत्री होणार आहे. तुम्ही काळजी करू नका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे की, हा मराठवाड्यातला नेता आम्हाला १०० टक्के मंत्रिमंडळात हवा आहे.

हे ही वाचा >> “…तोपर्यंत फेटा बांधणार नाही”, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये व्यक्त केला निर्धार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, तसं झालं तर (संतोष बांगर मंत्री झाले तर) या महाराष्ट्रात मटका (जुगाराचा एक प्रकार) अतिषय लोकप्रिय होईल. मटक्याला राजकीय मान्यता मिळेल. महाराष्ट्र सरकारची मटक्याला अधिकृत मान्यता मिळेल. महाराष्ट्र त्याची वाट पाहतो की काय हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं.