Amit Thackeray Latest News in Marathi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं किंवा हे बंधू भविष्यात एकत्र येतील अशी सातत्याने अटकळ बांधली जाते. २०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि शिवसेना व मनसे पक्षाची युती होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, आजतागायत ही युती झालेली नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक हे दोन्ही नेते एकत्र यावेत याकरता आशावादी असले तरीही त्यांच्या कुटुंबीयांची मात्र तशी अपेक्षा नाही, असं वारंवार समोर येतंय. आता मनसेचे माहीम येथील उमेदवार आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ते साम मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. माहीम विधानसभा निवडणुकासाठी अमित ठाकरे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने विविध माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर ते दिलखुलास व्यक्त होत आहेत. २०१७ साली शिवसेनेने मनसेचे सात नगरसेवक फोडले होते. याबाबत माहिती सांगताना अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच, त्यांच्याकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांना आणि दोन्ही भाऊ एकत्र येण्याला त्यांनी त्यांच्याकडून पूर्णविराम दिला.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”

हेही वाचा >> Amit Thackeray : “उद्धव ठाकरेंसारख्या लोकांपासून मी चार हात लांब, कारण..”, अमित ठाकरेंचं वक्तव्य

मनसे – शिवसेना एकत्र येणार का?

अमित ठाकरे म्हणाले, “मी तेव्हा आजारी होतो. मी वडिलांकडे पाहत होतो, मला माहीत होतं की माझे वडील काय आहेत. या गोष्टींचा त्यांना फरक पडणार नाही हे मला माहीत होतं. ते पुढे काय करणार हेही मला माहीत होतं. पण त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) नैतिकता पाळली नाही. पण आता हे सांगतात की आजारी असताना ४० आमदार फोडले. मी आजारी असताना नगरसेवक फोडले, मग तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का? आपण चुकीचं करतोय. वडील म्हणून मला संपूर्ण आत्मविश्वास आहे की ते काय करू शकतात. सात नगरसेवक गेले तर ते शंभर उभे करू शकतात. त्यांना वाईट वाटलं असणार पण आत्मविश्वास त्यांचा ढळला नसेल. तेव्हाच दोन भाऊ एकत्र यावेत, हा विचार माझ्यासाठी संपला. त्यामुळे मनसे-शिवसेने एकत्र येण्याची शक्यता आता माझ्याकडून तरी नाही.”

Story img Loader