Amol Kolhe vs Ajit Pawar on Saheb Remark : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. “केवळ एका पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे असा अर्थ होत नाही. राज्यात केवळ दोनच साहेब आहेत”. अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या साहेब या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी (१२ सप्टेंबर) खेड (पुणे) येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की “उमेदवारी कोणाला द्यावी, कोणाला नाही, याबाबत वारंवार कोणत्याही व्यक्तीला विचारावं लागत नाही, कारण आता आपणच साहेब आहोत”. त्यांच्या या वक्तव्यावर अमोल कोल्हे यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “राज्यात फक्त दोनच साहेब आहेत. एक शरद पवार आणि दुसरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आमची पिढी या दोनच नेत्यांना साहेब मानते. केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे असा अर्थ होत नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक आणि एकूणच सामाजिक व्यासंग असावा लागतो. त्यासाठी स्वकर्तृत्वावर मोठं व्हावं लागतं. कोणाच्याही जीवावर मोठं होऊन चालत नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल, संकटाच्या वेळी वादळं छातीवर घेणं असेल, संकट आलं म्हणून भूमिका बदलण्यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल, या सर्व गोष्टी करणं म्हणजे शरद पवार साहेब होणं असा अर्थ होतो. अजित पवार यांना ही गोष्ट माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने सांगायची आवश्यकता नाही”.

हे ही वाचा >> Ashish Deshmukh : महायुतीत धुसफूस? धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटलांवर भाजपा नेत्याचे गंभीर आरोप; म्हणाले, “अनिल देशमुखांच्या दबावामुळे…”

अजित पवार काय म्हणाले होते?

पुण्यातील खेड येथे अजित पवारांच्या पक्षाने गुरुवारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात अजित पवार म्हणाले होते, “राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे आपणच निर्णय घेणार”. त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, “अजित पवारांना खरे साहेब कोण आहेत हे चांगलंच माहिती आहे. आपणच साहेब हे अजित पवारांनी च्येष्ठेने केलेलं वक्तव्य असेल. राज्यात फक्त शरद पवार व बाळासाहेब ठाकरे हे दोनच साहेब आहेत”.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: “लाडकी बहीण नाही, ‘मुख्यमंत्री’ लाडकी बहीण योजना म्हणा”, शंभूराज देसाईंनी सुनावलं; महायुतीमध्ये श्रेयवादाची चढाओढ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देणार : अजित पवार

महायुतीत आळंदी खेडची जागा (विधानसभा मतदारसंघ) आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आली तर दिलीप मोहिते यांना पुन्हा एकदा निवडून द्या”, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. तसेच ते म्हणाले, तुम्हा सर्वांचं लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न आहे. ही जागा आपल्याकडे आल्यास, दिलीप मोहिते पुन्हा निवडून येतील. तेव्हा आपण खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देऊ.