राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकारने शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) महाविकास आघाडीतील काही नेत्यांची सुरक्षा कपात करण्याचा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यातील शिंदे सरकारवर सुडबुद्धीने निर्णय घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा – ‘मला गुवाहाटीहून परत यायचं होतं’, बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “मी तिथं जाऊन…”

काय म्हणाले अमोल मिटकरी?

मागील काही महिन्यांपूर्वी मला संशयास्पद गोष्टी जाणवल्या होत्या. त्यानंतर मी स्वत: महाराष्ट्र सरकारकडे सुरक्षेसाठी रितसर अर्ज केला होता. त्या अर्जानंतर गृहविभागाने ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा मला नागपूर विभागाकडून दिली होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कपात केली आहे. मी एका प्रवृत्तीविरुद्ध लढणारा माणूस आहे. ज्या लोकांनी राज्यात सामाजिक सलोखा बिघडवला, त्याविरुद्ध मी सातत्याने लढा दिला आहे. जर आमच्या जिवाचं काही बरं वाईट झालं किंवा काही अनुचित प्रकार घडला, तर याला सर्वस्वी जबाबदार शिंदे सरकार असेल, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

हेही वाचा – बच्चू कडू-रवी राणा वादात CM एकनाथ शिंदे करणार मध्यस्थी, दोघांनाही तातडीने ‘वर्षा’वर बोलावलं, आज तोडगा निघणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नागपूर विभागाच्या स्पेशल युनिट विभागाचा मला फोन आला आणि त्यांनी सुरक्षा कपात केल्याचे सांगितले. मी तिथल्या अधिकाऱ्यांना कारण विचारलं असता, त्यांनी कारण सांगण्यात नकार दिला. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षा काढून शिंदे गटाच्या नेत्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. रवी राणांनाही विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. मग आमची सुरक्षा का काढली? याचं कारण गृहविभागाने सांगावे”, अशी मागणीही त्यांनी केली.