महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजाबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते,’ अशा आशयाचं विधान अजित पवारांनी केलं. या विधानानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. तसेच अजित पवारांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणीही भाजपाकडून करण्यात आली आहे.

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनीही अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना खुलं आव्हान दिलं. छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा ज्ञात होत्या, त्या भाषांची नावं सांगावीत, असं खुलं आव्हान मिटकरींनी बावनकुळेंना दिलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “शिंदे गट गँगवॉरमध्ये मारला जाईल”; राऊतांच्या विधानावर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या टोळक्याचं…”

अजित पवारांच्या विधानाचं समर्थन करताना अमोल मिटकरी म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने वसलेल्या संभाजीनगरमध्ये काल जे पी नड्डा आले होते. यावेळी ते चक्क बाळासाहेब ठाकरेंचं नाव विसरले. ते बाळासाहेब ठाकरेंऐवजी बाळासाहेब देवरा म्हणाले. इतकंच नाही तर, त्यांनी ‘छत्रपती की जय’ अशा घोषणा दिल्या. शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं औदार्यही त्यांनी दाखवलं नाही.”

हेही वाचा- “भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई…”, राज्यपालांचा एकेरी उल्लेख करत मिटकरींचा भाजपाला खोचक सवाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या वल्गना करत आहेत. माझं बावनकुळेंना खुलं आव्हान आहे, छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा ज्ञात होत्या? आणि त्या भाषांची नावं बावनकुळेंनी सांगावीत… यासाठी माझं त्यांना खुलं आव्हान आहे. तसेच धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक यातील फरक तुम्ही आम्हाला शिकवू नये,” असा टोलाही मिटकरींनी लगावला. केंद्रात आणि राज्यात तुघलकी सरकार आहे. सत्तेत बसलेले औरंगजेबाचे वारस आहेत. त्यामुळे जनता लवकरच यांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असंही मिटकरी म्हणाले.