scorecardresearch

“…नन्हे पटोले … लाईलाज फफोले!”; नाना पटोले प्रकरणात अमृता फडणवीसांचीही उडी, मोदींना दिली सूर्याची उपमा

अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना सूर्याची उपमा देत त्यांच्याविषयी काही ओळी शेअर केल्या आहेत. यात त्यांनी नाना पटोले यांना टोलाही लगावला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. पटोले यांच्या विरोधात ठिकठिकाणी भाजपा नेत्यांनी निदर्शनं केली आहेत. अनेकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. काव्यात्मक शैलीत त्यांनी नाना पटोलेंना उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना सूर्याची उपमा देत त्यांच्याविषयी काही ओळी शेअर केल्या आहेत. यात त्यांनी नाना पटोले यांना टोलाही लगावला आहे. नरेंद्र मोदी यांचं काम दाखवणारा एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात, “सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले!”

हेही वाचा – “मी मोदींना मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो”; नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाकडून टीका

काय म्हणाले होते नाना पटोले?

“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….,” असे नाना पटोले या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलत असताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amruta fadnavis nana patole controversial statement about pm modi vsk

ताज्या बातम्या