महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जवळीकता वाढली आहे. २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल केला होता. दरम्यान, ते शरद पवारांबरोबर जवळीक वाढवताना दिसले होते. आता याच राजकीय स्थितीवरून अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच टोला लगावला आहे.

खरं तर, ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून राज ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी केली.

हेही वाचा- शर्मिला ठाकरे राजकारणात आल्या अन् तुमच्या पुढे निघून गेल्या तर झेपेल का? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले…

यावेळी अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंनी विचारलं की, “कधी तुम्ही राष्ट्रवादीच्या जवळ दिसता… कधी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर दिसता… तर कधी भाजपाला टाळी देता… तुमचं ‘कभी हा कभी ना’ हे नाटक खूप पाहिलंय. पण आता ‘हम साथ साथ है’ हे कुणाबरोबर आणि कधी करणार?” यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी केली.

हेही वाचा- “मी येतो म्हटलं की फडणवीस पळून जातात”, ५०० कोटी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी म्हणून मला हे विचारत नाहीत, त्यामुळे मी बोलूनच टाकतो. सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) कुणाबरोबर आहेत? हेच कळत नाही. कारण ते पहाटे गाडी घेऊन कुठेतरी जातात… हे कित्येकदा तुम्हालाही माहीत नसतं, मग ते कधीतरी शिंदेंबरोबर असतात. तर कधी पहाटे अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो, अशा अनेक गोष्टी घडताना दिसतात. कुणाला तरी भेटणं, ही प्रसारमाध्यमांसाठी बातमी झालीये. राजकारणातील मोकळेपणा मीडियाने घालवला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. कुणी कुणाशी बोललं आणि कुणी कुणाला भेटलं तर लगेच युती किंवा आघाडी होत नसते. जोपर्यंत याला मोठं स्वरुप येत नाही. तोपर्यंत त्यावर बोलण्याला काही अर्थ नाही.”