Anjali Damania Demanding Dhananjay Munde Resgination : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी अधिक लक्ष घातल्याने त्यांनीही त्यांच्या राजीनाम्यासाठी पिच्छा पुरवला आहे. दरम्यान, आता त्यांनी आणखी एक पुरावा शेअर केला असून त्यानुसार त्यांचा राजीनामा घ्याच, अशी मागणी पुन्हा केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अधिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
“वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते?”, असा सवाल त्यांनी केलाय. त्या पुढे म्हणाल्या, “Mahagenco ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी (wholly owned subsidiary) आहे. असे असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो?” असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय.
अंजली दमानिया यांनी त्या कंपनीचे परिशिष्टच (Annexures) शेअर केले आहे. यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. हे सर्व शेअर करत त्यांनी धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या, अशी पुन्हा मागणी केली आहे.
हे Office of Profit आहे
लाभार्थी !
धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या.
वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सरव्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. ह्यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते ?… pic.twitter.com/Oo4GtkvbtsThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 18, 2025
दरम्यान, काल बीडमध्ये गोळीबारात दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यावरही अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याची जाणीव त्यांना झालीय म्हणून जनता दरबार वगैरे घेतायत. परंतु, धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय. ज्योत मालवताना फडफडते, तसा प्रकार धनंजय मुंडे यांचा झालाय, असा घणाघात दमानिया यांनी केलाय.