वाई: शरद पवार यांना उद्देशून सैतान हा शब्द अनवधानाने वापरला असे सांगणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावर अपघातात काही लोक ‘देवेंद्रवासी’ झाले असा शब्दप्रयोग केला होता. म्हणून त्यांना गोळ्या घालणार का असे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

गावगाड्यांमध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा प्रस्थापितांना कडवट लागली. मला सेनापती पुन्हा गावगाड्याकडे आश्रयासाठी येत आहे त्याला रोखूया असं म्हणायचं होतं.मात्र असं बोलताना अनवधनान तो शब्द वापरला गेला असे स्पष्टीकरण रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बाोलताना दिले. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर ‘सैतान’ हा शब्द प्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टीकेची झाोड उठली. यावर सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात पत्रकारांपुढे आपली भूमिका मांडली.

आणखी वाचा-“…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री होतील”; भाजपा खासदाराचं थेट विधान, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार यांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केले. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली. गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर काळानं मोठा सुड उगवला आहे.त्यामुळे शरद पवार गावगाड्याकडे पुन्हा आश्रयासाठी धावतं आहेत. जैसी करणी वैसी भरणी कलयुगामध्ये ज्याचं पाप त्यालाचं फेडाव लागते. शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थांन फेडावे लागत आहे. हे आम्हा कार्यकर्त्यांचं काम आहे की गावगाड्यामध्ये हा सैतान पुन्हा येता कामा नये, अशी जळजळीत टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावर हा शब्द अनवधनाने वापरला गेला असे ते स्पष्टीकरण देत होते. त्याचवेळी शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावर अपघात झाला, त्यावेळेस काही लोक ‘देवेंद्रवासी’ झाले असा शब्दप्रयोग केला होता. पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा, त्यांना यावेळी देवाज्ञा झाली असा शब्दप्रयोग वापरायचा असेल परंतु ते देवेंद्रवासी झाले असे म्हणाले. त्यावेळी शरद पवार यांनी तो अनावधानाने तसा उल्लेख केला होता. म्हणून आता त्यांना गोळ्या घालणार का असे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले .गुण्यागोविंदाने शिवसेना-भाजप सरकार नांदत असताना यामध्ये फोडाफोडी कोणी केली, याचा इतिहास तपासावा लागेल. देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला सध्याच्या घडामोडींचं मोठं श्रेय द्यावं लागेल असा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला.