‘आम आदमी पार्टी’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल उद्या (गुरूवारी) राळेगणसिध्दी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. या भेटीबाबत येथे उत्सुकता आहे. राळेगणसिद्घीच्या ग्रामस्थांनी बुधवारी कडकडीत बंद पाळून हजारे यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. सायंकाळी सातच्या सुमारास थाळी मोर्चा काढण्यात येऊन त्यानंतर ग्रामसभा झाली. बुधवारी सकाळी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्घीत हजेरी लावली. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी हजारे यांचे वजन ९०० ग्रॅमने घटले असून रक्तदाबही वाढला आहे. राळेगणसिद्घी परिवाराने बुधवारी बंदची हाक दिल्याने गावातील सर्व व्यवहार बंद होते. शेतातील कामेही बंद ठेवण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2013 रोजी प्रकाशित
केजरीवाल आज अण्णांना भेटणार
‘आम आदमी पार्टी’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल उद्या (गुरूवारी) राळेगणसिध्दी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत.
First published on: 12-12-2013 at 01:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal to meet anna hazare today