शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत भाजपावर सडकून टीका केली आहे. मर्दांची अलवाद असाल, तर सरकारी यंत्रणा सोडून समोर या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं होतं. यावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष मर्दांची अवलाद असेल, तर सुपुत्राला वरळी विधानसभेचा राजीनामा द्यायला सांगा, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे. मर्दांची अवलाद असाल, तर सरकारी यंत्रणा सोडून समोर या. तुम्ही राजकारणातील नामर्द आहात. फक्त अमरावतीत नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला महाराष्ट्रात कुणी विचारत नव्हते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी खांद्यावर बसवून पुढे आणले आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : छगन भुजबळांचं ‘ते’ आव्हान, रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एकत्र ताकद लावणार की…”

यावर आशिष शेलार म्हणाले, “हा शब्द उद्धव ठाकरे स्वत:बद्दल का विचारतात, हा प्रश्न आहे. कोणत्याही सभेत गेलं की, आम्ही मर्दाचा पक्ष आहोत सांगतात. कोणी विचारलं होतं का? कोणाच्या मनात शंका आहे का? तुम्हाला स्वत:हून सांगण्याची गरज का पडत आहे? उद्धव ठाकरे यांचा पक्ष मर्दांची अवलाद असेल, तर सुपुत्राला वरळीचा राजीनामा देण्यास सांगा. पुन्हा निवडून यावे आणि मग या भाषा कराव्यात.”

हेही वाचा : “आमचा विचार केला नाही, तर…”, महादेव जानकर यांचा भाजपाला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी आणि माझे कुटुंब, यापेक्षा उद्धव ठाकरे हे विचार करत नाहीत. सामान्य शिवसैनिकांबद्दल उद्धव ठाकरेंनी कधी विचार केला का? मनोहर जोशी, लिलाधर ठाकरे, वामनराव परब, वामनराव महाडिक यांच्या कुटुंबीयांशी उद्धव ठाकरे यांनी केलेली वर्तवणूक चित्र स्पष्ट करते,” अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.